ताज्या बातम्या
एस नॅपकिन बुके’ज सत्कार हाऊस तर्फे आयोजित “सखा पांडुरंग” ऑनलाइन अभंग गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादआनंद विश्व गुरुकुलच्या आषाढी एकादशी दिंडीने ठाणे शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालेनवी मुंबई कामोठे शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरीआळंदी ते पंढरपूर वारीत थॅलेसेमिया बाबत माहितीसोलापूर शहरात मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीसजेजुरी-बेलसर जवळ अपघातात तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यूमुंबई प्रेस क्लबच्या अध्यक्षपदासाठी सुरेंद्र गांगण रिंगणात; मंत्रालय पत्रकारांकडून विजयाच्या शुभेच्छारेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरजIssue 3-YR14- 3 – 9 July-26 Mahasangharsh Newsमुंबई-गोवा महामार्गासह कोकणातील प्रमुख रस्ते जलमय आणि दरडींच्या विळख्यात; वाहतुकीचा खोळंबाआ. विक्रांत पाटील यांचा सामाजिक बांधिलकी जोपासत वाढदिवस साजरासिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडाकेबाज कारवाई करत केली गोवा बनावटीची दारू जप्तसिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाईप्रसूतीसाठी आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या महिलांना एम्ब्युलन्सची सुविधा द्यावी – आमदार डॉ. नीलम गोऱ्हेझाडांच्या मुळांची गळचेपी करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर ‘सदोष मनुष्यवधा’ चा गुन्हा दाखल करा; सुराज्य अभियानाची मागणी

गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात

🔳 मानखुर्द प्रतिनिधी 🔳 दि.२७:
महाराष्ट्र मंडळ (बी.ए.आर.सी) शिक्षण संस्था संचलित नूतन विद्या मंदिर, मानखुर्द या शाळेने फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एस.एस.सी) परीक्षेत सलग शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली. या यशानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण व गुणगौरव सोहळा होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक (रसायन तंत्रज्ञान वर्ग) तथा मराठी भाषा परिषदेचे अध्यक्ष श्री. महेश देशपांडे होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर जीवनात मोठे यश मिळवता येते, असा प्रेरणादायी संदेश दिला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र मंडळ (बी.ए.आर.सी) शिक्षण संस्थेचे कार्यवाह श्री. राजेंद्र हटवार होते. त्यांनी शाळेच्या शतप्रतिशत निकालाबद्दल विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.
मुख्याध्यापक श्री. शैलेंद्र कदम यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे, शिक्षकांच्या समर्पणाचे, पालकांच्या सहकार्याचे आणि संस्थेच्या भक्कम पाठबळाचे कौतुक करत, विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहून प्रामाणिक परिश्रम करण्याचा संदेश दिला.


यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्हे प्रदान करून गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वतीने कु. प्रणिता देटके, तर पालकांच्या वतीने श्रीमती सुमित्रा भोर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती संगीता पंदिलवार व श्रीमती सुजाता रणदिवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष राजेश सावंत, प्रमुख पाहुणे महेश देशपांडे, कार्यवाह राजेंद्र हटवार, मुख्याध्यापक शैलेंद्र कदम, संस्थेचे अधिकारी अनिल कुंटे तसेच संस्थेचे माजी उपाध्यक्ष प्रभाकर अडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!