ताज्या बातम्या
‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्नपुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करणार : एस.एम.देशमुख

जनसेवेलाच वाढदिवसाचे स्वरूप…!


🔳 नवी मुंबई प्रतिनिधी 🔳 दि.०५जुलै:
पनवेलचे दमदार, विकासाभिमुख आणि जनतेच्या सुख-दुःखात सदैव खंबीरपणे उभे राहणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार मा. श्री विक्रांतदादा पाटील यांच्या दि. १२ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त, आज कामोठे येथील मसाला मंत्रा बॅन्क्वेट हॉल येथे भव्य मोफत नेत्रतपासणी, चष्मा वाटप व छत्री वाटप या सामाजिक उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.


या उपक्रमाला कामोठे शहरातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला. आमदार मा. विक्रांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते गरजू नागरिकांना मोफत चष्मे व छत्र्यांचे वितरण करण्यात आले. समाजसेवेचा हा उपक्रम नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने लोकहिताचा ठरला. जनतेच्या आरोग्याचे आणि पावसाळ्यात सुरक्षिततेचे गांभीर्य लक्षात घेऊन नेत्र चिकित्सा शिबिर, चष्मे वाटप व छत्री वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.


यावेळी श्री राजकुमार पाटील, नगरसेवक श्री समीर कदम, श्री प्रशांत कदम, श्री देवीदास खेडकर, श्री भगवान गोवारी, श्री रविंद्र जाधव, श्री माऊली मोरे, श्री गोरख हुलगे, श्री आकाश पाटील, श्री सुशांत काटकर, सौ. रंजनाताई सडोलीकर, सौ. राजश्री पाटील, एन.पी. खरजे सर तसेच अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🔳 श्री राजकुमार पाटील 🔳
मा. आमदार विक्रांतदादा पाटील यांना येणाऱ्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
“जनतेच्या सेवेतूनच खऱ्या नेतृत्वाची ओळख निर्माण होते.” सामाजिक बांधिलकी, विकासाची दूरदृष्टी आणि सर्वसामान्यांप्रती असलेली आत्मीयता या बळावर आमदार विक्रांतदादा पाटील यांचे नेतृत्व अधिकाधिक बळकट होत राहो, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड जनसेवेचे बळ लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

error: Content is protected !!