ताज्या बातम्या
बीआयएस (BIS) स्टॅंडर्ड क्लबची ‘स्टॅंडर्ड रायटिंग कॉम्पिटिशन’ व पहिली ॲक्टिव्हिटीपिंपळे विद्यालयात स्व. ना. अजित दादा पवार यांची जयंती साजरीजय मल्हार क्रांती संघटनेच्या पुरंदर तालुका युवक अध्यक्षपदी सुनील गोफणे यांची निवडबाबाराजे जाधवराव लोकाभिमुख नेतृत्व – सौ. संगिता काळेइस्रो नासाच्या उपक्रमाच्या अंतिम फेरीसाठी वेदांतची निवडएसआयआर मोहिमेत भायखळ्याचा राज्यातील महानगरांत प्रथम क्रमांकअतिवृष्टीत प्रवाशांच्या मदतीला धावली महामार्ग आय.आर.बी. कपंनी आपत्कालीन व्यवस्थापन टीमशिक्षक सेवा पूर्तीची 30 वर्षे पूर्णवृत्तपत्रांवर बचतीची कात्री; सरकारच्या निर्णयावर पत्रकार परिषदेचा तीव्र आक्षेपवाघापूर येथे पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणएस नॅपकिन बुके’ज सत्कार हाऊस तर्फे आयोजित “सखा पांडुरंग” ऑनलाइन अभंग गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादआनंद विश्व गुरुकुलच्या आषाढी एकादशी दिंडीने ठाणे शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालेनवी मुंबई कामोठे शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरीआळंदी ते पंढरपूर वारीत थॅलेसेमिया बाबत माहितीसोलापूर शहरात मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस

बारामती प्रतिनिधी :दि.१५(अकबर पठाण)


दि. 15 जून रोजी पर्व काळाच्या मुहूर्तावर रात्री बारा वाजल्यापासून ते सकाळी साडेआठ पर्यंत सोमवती अमावस्याचा उत्सव मोरगावचे श्री मोरेश्वर गणपती मंदिरात साजरा करण्यात आला. सकाळी श्री मोरेश्वर मंदिरातून मोरगाव शहरातून करा नदीच्या दिशेने पालखीचे प्रस्थान झाले. पालखीमध्ये श्री मयुरेश्वराची उत्सव मूर्ती शाही स्नानासाठी कऱ्हा नदीच्या दिशेने निघाली. सनई, चौघडे, नौबत या पारंपरिक वाद्यासह मोरगाव मधून पालखी वाजत गाजत निघाली. शाही स्नानासाठी पालखी जाताना मंदिरापुढे दोन तोफांच्या तीन सलामी देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त पालखी सोहळ्यात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. कऱ्हा नदीवर श्रींची पालखी येताच पुन्हा दोन तोफांची सलामी देण्यात आली. मोरगावचे श्री मयुरेश्वर देवाचे मानकरी मंडळींनी मूर्तीला शाही स्नान घातले. शाही स्नान झाल्यानंतर पालखीचे पुन्हा मंदिराकडे प्रस्थान झाले. श्रींची पालखी मंदिरात आल्यानंतर मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली. मागील अनेक दिवसांपासून पुरातत्व विभागाकडून पुरातन पाषाण मंदिराचे नूतनीकरण सुरू असल्याने महाआरतीनंतर मंदिर पुन्हा बंद करण्यात आले. मान्सूनचे अजूनही आगमन न झाल्याने नदीला पाणी नसल्याने टँकरद्वारे पाण्याने श्रींना स्नान घालण्यात आले. लवकर मान्सून सुरू होण्यास श्रींकडे भाविकांनी साकडे घातले.

error: Content is protected !!