संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सासवड मुक्कामी उपक्रम
थॅलेसेमिया सोसायटीचे सचिव समीर निकम यांची माहिती

🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.१४, जुलै ,२०२६:
पुरंदर तालुक्यातील सासवड मुक्कामी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा विसावला होता. सासवड मध्ये लाखो वारकरी भाविक भक्त जमा झाले होते. सगळीकडे आनंदमय वातावरण व जागोजागी राहूत्या उभारल्या गेल्या होत्या.
यावेळी पुण्यातील एम.व्ही.आर फाउंडेशन व थॅलेसेमिया सोसायटी महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांना थॅलेसेमिया बाबत माहिती देऊन, जनजागृती करण्यात आली.

या दरम्यान नांदेड, परभणी व अहिल्यानगर या भागातील रुग्णांचे नातेवाईक भेटले असून, त्यांनी, “आम्ही फक्त रक्त चढवत असल्याची व रक्त चढवल्यानंतर लोह कमी करण्याची गोळी देत नसल्याचे सांगितले.” सालाबाद प्रमाणे यावर्षीही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला. वारीच्या माध्यमातून असेच जनसेवेचे कार्य पुढेही सुरू ठेवू, असे थॅलेसेमिया सोसायटीचे सचिव समीर निकम यांनी सांगितले.

(फोटो – सासवड (ता. पुरंदर) येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात भाविक भक्तांना थॅलेसेमिया बाबत माहिती देताना, थॅलेसेमिया सोसायटीचे सचिव समीर निकम)
