ताज्या बातम्या
‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्नपुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करणार : एस.एम.देशमुख



🔳 मुंबई विशेष प्रतिनिधी 🔳 : ०६जुलै,२०२६: (दीपक कैतके):

  कोकणात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवनावर गंभीर परिणाम केले असून, महत्त्वाच्या वाहतूक मार्गांचे कंबरडे मोडले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून, प्रशासनाने युद्धपातळीवर मार्ग मोकळा करण्याचे काम हाती घेतले आहे. दरडीचा काही भाग निवासी वस्त्यांपर्यंत पोहोचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

केवळ कशेडी घाटच नव्हे, तर वरंधा घाटाची परिस्थितीही बिकट बनली आहे. वारवंड ते उंबर्डे दरम्यानच्या टप्प्यावर चार ते पाच ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे हा घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. ढगफुटीसदृश पावसाचा जोर कायम असल्याने दरड हटवण्याच्या कामात अडथळे येत आहेत.

रायगड जिल्ह्यातही पावसाचे थैमान सुरू आहे. मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ आंबेत पुलाजवळ बार्जेस वाहून आल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे. खबरदारी म्हणून मंडणगड-म्हाप्रळ आणि गोरेगाव-माणगाव मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. याशिवाय, पेण-खोपोली मार्गावर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे.

सुधागड तालुक्यातील कानसळ येथे अंबा नदीपात्रात अडकलेल्या १२ कामगारांची स्थानिक प्रशासनाने धाव घेत सुखरूप सुटका केली आहे. सद्यस्थितीत पोलीस, महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासन आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज झाले आहे. पूर आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे परिस्थिती नाजूक असून, प्रशासनाने नागरिकांना विनाकारण प्रवास टाळण्याचे आणि केवळ अधिकृत सूचनांचेच पालन करण्याचे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!