ताज्या बातम्या
‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्नपुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करणार : एस.एम.देशमुख

🔳 मुंबई प्रतिनिधी 🔳 दि.30 जून : (सुरेश गायकवाड):

 महाराष्ट्र राज्यात जवळजवळ ५ लाखाअधिक शासकीय ठेकेदार कार्यरत असून गेली २-३ वर्षांपासून त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळत नाही.त्यांच्या कामाची जवळजवळ ९० हजार कोटीच्या बिलाच्या रक्कमा सरकारकडे पडून आहे.अशावेळेस सरकार देश अडचणीत आहे असे सांगते.आणि अशी खरोखर परिस्थिती असेल तर सरकारने तसे जाहीर आवाहन करावे.जेणेकरून देशासाठी ९० हजार कोटी रुपये समर्पित करण्यात आम्ही मागेपुढे पाहणार नाही.कारण देश असेल तर आपण असू असे महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनच्या पदाधिकार्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

 यावेळेस फेडरेशनच्या पदाधिकार्यांनी सांगितले की,यापूर्वी सरकारकडे असलेली बिले पडून न राहता लवकर मंजूर होत होती. पण,सध्या २/३ वर्षांपासून बिले पडून आहे. ज्यामुळे ठेकेदारांना त्याचा खूपच त्रास सहन करावा लागत.त्यात काही ठेकेदारांना आपला जीव गमवावा लागला.ही सध्याची परिस्थिती आहे. अशीच परिस्थिती राहिली तर ठेकेदारांचे आणि त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्य उद्धवस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते होऊ नये यासाठी राज्यातील सर्व संघटना एकत्र येऊन फेडरेशनची स्थापना करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली. त्यात फेडरेशनच्या अध्यक्षपदी बापू लाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून लवकरच कार्यरकारणी जाहीर करण्यात येईल.आणि फेडरेशनच्या कामाची दिशा ठरवता येईल. जेणेकरून प्रत्येक जिल्ह्यात आंदोलने,मोर्चा काढून अन्यायाविरोधात आवाज दिला जाईल. 
 
एवढेच नव्हे तर सरकारने पावसाळी अधिवेशनात आमच्या कामाची बिले मंजूर करून आमच्या कामाचा मोबदला दिला नाही तर यापुढें उग्र आंदोलन छेडण्यात येईल.त्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री,अधिकारी यांच्या निवासस्थानी घेराव,लोटांगण, पुतळे जाळणे आदी विविध प्रकाराची आंदोलने करण्यात येईल. आणि सरकारला छोटे,मोठा असा ठेकेदारांमध्ये भेद न करता सर्वाना कामे मिळण्यासाठी लक्ष वेधले जाईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
error: Content is protected !!