ताज्या बातम्या
‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्नपुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करणार : एस.एम.देशमुख

🔳 कामोठे प्रतिनिधी 🔳 दि.26:
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना पुरस्कृत रामदास दादा गोवारी सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक वह्या वाटप कार्यक्रम कामोठे येथे उत्साहात संपन्न झाला.
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळावी आणि शिक्षणाचा प्रसार व्हावा या सामाजिक उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते श्री. बबनदादा पाटील, संपर्कप्रमुख श्री. प्रसाद भोईर, जिल्हाप्रमुख श्री. दिपक निकम, उपजिल्हाप्रमुख श्री. रामदास पाटील, उपजिल्हाप्रमुख श्री. भरत पाटील, महानगरप्रमुख श्री. समाधान काशीद, गटनेत्या व नगरसेविका सौ. लीना गरड, नगरसेविका सौ. रितिक्षा गोवारी, शहरप्रमुख श्री. रामदासदादा गोवारी, उपशहरप्रमुख श्री. गणेश खांडगे, युवा महानगरप्रमुख श्री. महेश भिसे, शहरसंघटक श्री. संतोष गोळे, शहर समन्वयक श्री. विलास कामोठकर, विभागप्रमुख श्री. बबन गोगावले, श्री. मनोज जाधव, श्री. सुनील गोवारी, श्री. रमेश गोवारी, शाखाप्रमुख श्री. एकनाथ गोवारी, श्री. सुरेश मोरे, श्री. शंकर व्हणमाने, श्री. बाबा ढोमे, श्री. निलेश ठाकूर, श्री. ज्ञानेश्वर आहेर तसेच इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत, शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले. समाजातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शैक्षणिक मदत पोहोचविण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन भविष्यातही सातत्याने करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. यावेळी मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

error: Content is protected !!