ताज्या बातम्या
एस नॅपकिन बुके’ज सत्कार हाऊस तर्फे आयोजित “सखा पांडुरंग” ऑनलाइन अभंग गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादआनंद विश्व गुरुकुलच्या आषाढी एकादशी दिंडीने ठाणे शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालेनवी मुंबई कामोठे शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरीआळंदी ते पंढरपूर वारीत थॅलेसेमिया बाबत माहितीसोलापूर शहरात मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीसजेजुरी-बेलसर जवळ अपघातात तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यूमुंबई प्रेस क्लबच्या अध्यक्षपदासाठी सुरेंद्र गांगण रिंगणात; मंत्रालय पत्रकारांकडून विजयाच्या शुभेच्छारेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरजIssue 3-YR14- 3 – 9 July-26 Mahasangharsh Newsमुंबई-गोवा महामार्गासह कोकणातील प्रमुख रस्ते जलमय आणि दरडींच्या विळख्यात; वाहतुकीचा खोळंबाआ. विक्रांत पाटील यांचा सामाजिक बांधिलकी जोपासत वाढदिवस साजरासिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडाकेबाज कारवाई करत केली गोवा बनावटीची दारू जप्तसिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाईप्रसूतीसाठी आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या महिलांना एम्ब्युलन्सची सुविधा द्यावी – आमदार डॉ. नीलम गोऱ्हेझाडांच्या मुळांची गळचेपी करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर ‘सदोष मनुष्यवधा’ चा गुन्हा दाखल करा; सुराज्य अभियानाची मागणी

प्रहार संघटनेची प्रशासनातील ५४ कोटी घोटाळा संबधित जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करून दोषी अधिकाऱ्यांची निलंबनाची मागणी !!

🔳 नवी मुंबई प्रतिनिधी 🔳 दि.२२:

कळंबोली येथे असलेली आशिया खंडातील सर्वात मोठी व्यापार करीता असलेली मुंबई महानगर प्रदेश प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमिता आणि भ्रष्टाचार झाल्याचे लेखा परीक्षण अहवालातून उघड झाले आहे. त्यामुळे बाजार समितीचे अपरिमित नुकसान झाले असून या ठिकाणी लोखंड व पोलाद व्यापार करणाऱ्या व्यावसायिक यांच्यावर नियंत्रण आणि देखभाल करण्यासाठी शासनाने मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समितीची स्थापना केली आहे.

  तसेच या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी व्यापारी यांच्याकडून सेवा शुल्क व कर आकारणी करून सेवा दिली जाते व आस्थापनाचा पूर्ण खर्च केला जातो. परंतु दोन वर्षापूर्वी मुदत ठेवी बँकेत गुंतवणूक करताना ५४ कोटींचा घोटाळा झाला व त्यातून बाजार समितीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. याची दखल घेत शासनाने घोटाळा करणाऱ्या व आपले कर्तव्ये पार न पाडणाऱ्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, लेखा विभागातील अधिकारी आणि तत्कालीन बाजार समिती कार्यकारणी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले असताना, यावर बाजार समिती प्रशासन यांनी कारवाई केली नाही.

  तसेच नियमबाह्य पद्धतीने कनिष्ठ अभियंता याला कार्यकारी अधिकारी या पदाचे अतिरिक्त कार्यभार देणे, सामाजिक सेवा सुविधा करिता आरक्षित असलेल्या भूखंडावरील अतिक्रमण काढणे, लोखंड व पोलाद व्यवसाय सोडून इतर व्यवसाय करणारे यांचे करारनामा रद्द करणे, नियमबाह्य पद्धतीने ३ वर्षापेक्षा जास्त कालावधी पूर्ण केलेल्या सेवा निवृत्त अधिकारी यांची सेवा समाप्त करणे, शासन निर्णय डावलून कंत्राटी पद्धतीने नियुक्ती दिलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना बाह्य यंत्रणे मार्फत पुन्हा नियुक्ती देणे व बाजार समिती यांनी आकृतिबंद प्रस्ताव तयार करून शासनास सादर करणे या प्रमुख मागण्यासाठी प्रहारच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

सदर बाजार समितीच्या प्रशासन सोबत पार पडलेल्या बैठकीत सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन नियमानुसार तत्काळ कारवाई करण्याचे आदेश राजेंद्र वीर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशासनाला दिले आहेत. यावेळी बैठकी करिता प्रहारच्या वतीने डॉ. सुनील शिरीषकर, जिल्हा अध्यक्ष रायगड, अजय कदम, अभिनव येलवे, राहुल तेलंग, पंकज मोहिते आदी पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे डॉ. सुनील शिरीषकर यांनी दिली आहे.

error: Content is protected !!