ताज्या बातम्या
बीआयएस (BIS) स्टॅंडर्ड क्लबची ‘स्टॅंडर्ड रायटिंग कॉम्पिटिशन’ व पहिली ॲक्टिव्हिटीपिंपळे विद्यालयात स्व. ना. अजित दादा पवार यांची जयंती साजरीजय मल्हार क्रांती संघटनेच्या पुरंदर तालुका युवक अध्यक्षपदी सुनील गोफणे यांची निवडबाबाराजे जाधवराव लोकाभिमुख नेतृत्व – सौ. संगिता काळेइस्रो नासाच्या उपक्रमाच्या अंतिम फेरीसाठी वेदांतची निवडएसआयआर मोहिमेत भायखळ्याचा राज्यातील महानगरांत प्रथम क्रमांकअतिवृष्टीत प्रवाशांच्या मदतीला धावली महामार्ग आय.आर.बी. कपंनी आपत्कालीन व्यवस्थापन टीमशिक्षक सेवा पूर्तीची 30 वर्षे पूर्णवृत्तपत्रांवर बचतीची कात्री; सरकारच्या निर्णयावर पत्रकार परिषदेचा तीव्र आक्षेपवाघापूर येथे पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणएस नॅपकिन बुके’ज सत्कार हाऊस तर्फे आयोजित “सखा पांडुरंग” ऑनलाइन अभंग गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादआनंद विश्व गुरुकुलच्या आषाढी एकादशी दिंडीने ठाणे शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालेनवी मुंबई कामोठे शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरीआळंदी ते पंढरपूर वारीत थॅलेसेमिया बाबत माहितीसोलापूर शहरात मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस

 पुरंदर प्रतिनिधीदि.१७:
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा दिवे येथे १५ जून २०२६ रोजी शाळा प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन गोपीचंद आल्हाट समाज कल्याण निरीक्षक सहाय्यक आयुक्त कार्यालय समाज कल्याण पुणेसदर गोपीचंद आल्हाट, गृहप्रमुख पद्मा सुतार, गृहपाल रमेश कोरे या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.


शाळा प्रवेश उत्सव अंतर्गत प्रवेशद्वारापासून नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे बैलगाडीतून वाजत गाजत शाळेपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना स्वागत म्हणून वेलकम किट व गुलाब पुष्प देण्यात आले. तसेच सेल्फी पॉईंट मध्ये सदर विद्यार्थ्यांचे फोटो काढून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते शाळेतील नाविन्यपूर्ण “स्टेम फ्युचरिस्टिक लॅब” चे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित प्रमुख पाहुणे व पालक यांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण घेण्यात आले.

तसेच सहाय्यक शिक्षक प्रशांत धेंडे यांनी नवप्रवेशित विद्यार्थी व पालक यांना शाळेविषयीची व समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. पद्मा सुतार यांनी मार्गदर्शनपर भाषण केले व मुख्याध्यापिका विमल खाडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या व शिक्षक यांच्या सहकार्याने आपण निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना घडवू असे आश्वासन दिले. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका अंजली बासुतकर यांनी केले. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!